Bhosari : दोन तरुणांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या (Bhosari)बाजूला लघुशंका करत असलेल्या दोन तरुणांना ‘इथे लघुशंका का केली’ असे म्हणत चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 18) मध्यरात्री दीड वाजता कासारवाडी येथे घडली.

अक्षय पोपट जगताप (वय 28, रा. हिंजवडी), विश्वास भगवान माळवे (रा. नवी सांगवी) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. अक्षय यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून पिंपळे गुरव येथून कासारवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. ते एका ठिकाणी थांबून लघुशंका करत असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना इथे लघुशंका करू नका, असे सांगितले. त्यानंतर दुचाकी पुढे गेली. तीच दुचाकी काही वेळाने पुन्हा माघारी आली.

त्यांच्यासोबत कारमधून दोघेजण आणखी आले. चौघांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला ‘इथे लघुशंका का केली’ असा जाब विचारत बेदम मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Pune : भारतीय विद्या भवनामध्ये रंगणार ‘लावणी ठसका’ कार्यक्रम; सर्वांना विनामूल्य प्रवेश!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.