Bhosari : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच; भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला

Vehicle theft sessions continue in the city; Two bikes were stolen from Bhosari area

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून 7 व 10 जुलै दरम्यान भोसरी येथून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी शुक्रवारी (दि.10) भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरीची पहिली घटना, 7 ते 8 जुलै दरम्यान इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी हरिशरण अयोध्या यादव (वय. 48, रा.इंद्रायणी नगर, भोसरी ) यांनी शुक्रवारी (दि.10) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिशरण यांनी त्यांची दहा हजार किंमतीची दुचाकी (एमएच 14 एआर 2010) घरासमोर लाॅक करून पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना 9 ते 10 जुलै दरम्यान महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी येथे घडली. याप्रकरणी विकी पुंडलिक गजधने (वय. 28, रा. दुर्गामाता काॅलनी, महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.10) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकी यांनी त्यांची पन्नास हजार किंमतीची दुचाकी (एमएच 13 सीडब्लु 0233) घरासमोर लाॅक करून पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.