BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: विलास लांडे यांचा पहाटेपासूनच मतदारांशी संवाद

व्यायाम व फिरायला आलेल्या नागरिकांना भेटले

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदावर विलास लांडे यांनी आज (गुरूवारी) पहाटेपासूनच मतदारसंघात विविध ठिकाणी फिरायला येणाऱ्या मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले.

गुरूवारी औद्योगिक क्षेत्राला सुट्टी असते. त्यामुळे मतदारसंघातील अनेक नागरिक सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडतात. या नागरिकांना भेटण्यासाठी विलास लांडे यांनी गुरूवारी पहाटेपासूनच मतदारसंघात प्रचार दौऱ्याला सुरूवात केली. त्यांनी सकाळी व्यायाम तसेच फिरायला आलेल्या लोकांशी संवाद साधला. भोसरी मतदारसंघाच्या विकासासाठी सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतल्याचे लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

या मतदारसंघाची पाच वर्षे वाया गेली आहेत. त्याचा विचार करून आता प्रत्येकाचे मत मतदारसंघाला खंबीर आणि सक्षम करणार आहे. त्यासाठी कपबशीला मतदान करा, असे आवाहन विलास लांडे यांनी नागरिकांना केले. सकाळी व्यायाम तसेच फिरायला आलेल्या महिला व पुरूषांनी विलास लांडे यांचे स्वागत करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. लांडे यांनी सर्वांना मतदान करण्याचेआवाहन करून पुढील प्रचारासाठी मार्गस्थ झाले.

यावेळी याकूब शेख, संगप्पा मुळे, दत्ता धाडगे, अशोक मासुळकर, संतोष उकिरडे, दीपक ढेरंगे, उमेश लोहकरे, सुभाष काळे, गणेश साळसकर, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.