Bhosari : भोसरी गावच्या जत्रेचे 8 एप्रिल ते 9 एप्रिल रोजी आयोजन

एमपीसी न्यूज : दरवर्षी सालाबादप्रमाणे होणारी हनुमान जयंती निमित्त (Bhosari) भोसरी गावच्या भैरवनाथ महाराजांची यात्रा यावर्षी 8 आणि 9 एप्रिल या तारखेला होणार आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर संपूर्ण भोसरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक होत असते.
पूर्वापारपासून चालत असलेली ही परंपरा असून या बैठकीत आगामी पीक पाण्याविषयी भाकीत वर्तवण्याची जुनी परंपरा आहे. यावेळी गावातील आबाल वृद्धापासून तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. भोसरीतील भैरवनाथ महाराज मंदिरात झालेल्या या बैठकीत गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात येते.
आधुनिक काळात अनेक गावांचे रुपांतर शहरात झाले. त्या सारखेच भोसरी गाव देखील औद्योगिक नगरी म्हणून नावारुपाला आले. त्याचप्रमाणे भोसरी गाव आता एक मेट्रो सिटीकडे वाटचाल करत असतानाच जुन्या परंपरा जपण्याचे व कायम ठेवण्याचे काम गावकरी करीत असल्याचे दिसून येते.
Pune News : प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान
आधुनिक काळात देखील गावची यात्रा पारंपारिक पद्धतीनेच आयोजित करण्यात येते. 8 एप्रिल रोजी चक्री भजन पारंपारिक ढोलताशा मंडळांचा खेळ, पालखी प्रदीक्षिणा, भव्य बैलगाडा शर्यत, लोककला तमाशाचा कार्यक्रम व ९ एप्रिल रोजी भव्य कुस्त्यांच्या आखाडयाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रमाणे यावर्षी भोसरी गावचा उत्सव (Bhosari) साजरा करण्याचा निर्णय समस्त भोसरीकर ग्रामस्थांनी नाथसाहेबांच्या चांगभलच्या घोषणाने संमत केला.