Bhosari : पोस्ट ऑफिसमधून महिलेची पर्स पळवली

एमपीसी न्यूज – पोस्ट ऑफिसमध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या महिलेची हॅन्डबॅगमधील पैशांची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी दहाच्या सुमारास भोसरी पोस्ट ऑफिसमध्ये घडली.

सीमा मधुसूदन परनाटे (वय 34, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास भोसरी पीसीएमसी दवाखान्याजवळ असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये पैसे भरण्यासाठी गेल्या. पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म भरत असताना सीमा यांच्या खांद्याला अडकवलेल्या हॅन्डबॅगमधील पैशांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यामध्ये 26 हजार रुपयांची रोकड ठेवली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like