Bhosari: आढळराव यांना निवडून आणून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करू – महेश लांडगे

देशाच्या सुरक्षिततेची ही निवडणूक; भोसरीत महायुतीचा विजयी संकल्प मेळावा 

एमपीसी न्यूज – देश एकसंध ठेवणे गरजेचे आहे. आजवर अनेक लढाया, हल्ले झाले. परंतु, गेल्या पाच वर्षात झालेल्या हल्याला जशाच-तशे प्रत्युत्तर सैनिकांनी दिली. सैनिकांकडे शौर, ताकद आहे. या सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिले. या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. ही निवडणूक देशाची असून ती आपल्याला जिंकायची आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत. शिरुरमधून शिवाजीराव आढळराव यांना निवडून आणून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करु, असे मत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.  तसेच भोसरीतून आढळराव यांना सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचेही, लांडगे म्हणाले. 

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ आज (बुधवारी) भोसरीतील संत ज्ञानेश्वर गार्डन मंगल कार्यालय येथे विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत  होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अॅड. प्रतिभा लोखंडे, विजय फुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, शिरुर महिला संघटिका सुलभा उबाळे, भाजप-शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगामध्ये भारताचा दर्जा उंचावला आहे. देशाच्या सुरक्षिततेची ही निवडणूक आहे. देशाच्या हितासाठी ही निवडणूक आहे. देश सुरक्षित नाही राहिला. तर आपण देखील सुरक्षित राहू शकत नाही. देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत. घरात, भावा-भावा, मित्रांमध्ये भांडणे होतात. आता भांडणे संपली आहेत. कोणतेही मतभेद राहिले नाहीत.

माणूस कर्तृत्वातून मोठा होता. ज्याचे चांगले कर्तृत्व आहे. त्याला काहीच अडचण येत नाही. त्यामुळे कोणाला वाईट बोलायचे नाही. त्याचे कर्म त्याला घेऊन जाते. दुस-याकडे बोट दाखवायचे नाही. त्याकडे बोट करताना आपल्याकडे चार बोटे असतात. त्यामुळे कोणाबद्दल वाईट बोलू नका. बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकारने मदत केली आहे. हेवेदावे- बाजुला काढा. सगळे पदाधिकारी एकदिलाने काम करतील, असेही आमदार लांडगे म्हणाले.

आढळराव म्हणाले, देशाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. पुढच्या पाच वर्षात देशाचे भवितव्य, जगाच्या पाठीवर देशाचे नाव कसे राहणार आहे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठिवर भारताची ओळख निर्माण करुन दिली. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ मोदी यांच्यामध्ये आहे. पाच वर्षात त्यांच्या राजवटीत अनेक विकास कामे झाली आहेत. एनडीए सरकारच्या राजवटीत शिरुर मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

युपीए सरकारच्या काळात अनेक प्रकल्पाबाबत मंत्र्याकडे पाठपुरावा केला. परंतु, त्याकडे दुर्लक्षित करण्यात आले. आता तेच लोक वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या काळात रेल्वेचे देखील काही झाले नाही. भाजप सरकारच्या काळात रेल्वेला मंजुरी मिळाली. निधी मिळाला. अनेक योजनांना चालना मिळाली आहे. रेडझोनचा प्रश्न प्रलंबित आहे. काँग्रेसच्या काळात पहिले दहा वर्ष रेडझोनबाबत काहीच केले नाही. 2014 ला भाजपची सत्ता येताच तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काम पुर्ण करत आणले होते, असेही आढळराव म्हणाले. विजय आपलाच आहे. परंतु, गाफील राहू नका. त्यासाठी प्रयत्न करा. केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा असेही ते म्हणाले.

एकनाथ पवार म्हणाले, महायुतीचे उमेदवार आढळराव यांचे एका लाखापेक्षा अधिक मताधिक्य असणार आहे. भोसरीचा दादा शिरुरच्या दादासोबत आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे. सुलभा उबाळे म्हणाल्या, महायुतीचा झेंडा शिरुर ते दिल्लीपर्यंत नेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे.  अभिनयावर मते मिळत नाहीत. त्यासाठी जनतेची सेवा करावी लागत असे म्हणत त्यांनी आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना टोला लगाविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.