_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Bhosari: ‘सफारी पार्क’चा लेखी आदेश कुठेयं? –विलास लांडे; भोसरी मतदारसंघात फेकाफेकीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात काहींनी तुफान ‘फेकाफेकी’सुरू केली आहे. सिंगापूरमधील उद्यानाच्या धर्तीवर मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यास शासनाची मंजुरी मिळाल्याचे सांगत ढोल बडविण्यात येत आहेत. मात्र, त्याबाबतचा पर्यटन विभागाचा अथवा शासनाचा लेखी आदेश कुठे आहे?, असा सवाल अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी केला आहे.

यावेळी विलास लांडे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील सफारी पार्क म्हणून आरक्षित करण्यासाठी आपण पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळात सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे महापालिकेने स्वतंत्र कचरा डेपोसाठी मागितली. मोशी ग्रामस्थांवर यापूर्वीच शहराचा शंभर टक्के कचरा लादण्यात आला असताना पुणे महापालिकेचा कचरा लादण्याचा प्रयत्न मोशीकरांनी हाणून पाडला. प्रसंगी बंद पाळला, आंदोलन केले. मात्र, हा डेपो आपण पळवून लावल्याचे काहीजण सांगत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

वास्तविकतः पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. पालकमंत्री देखील भाजपचेच आहेत. त्यांच्याच सुपिक डोक्यातून पुण्याचा कचरा मोशीकरांवर लादण्याची कल्पना पुढे आली. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मागेपुढे कोण फिरत होते? हे अख्ख्या पिंपरी-चिंचवडकरांना माहिती आहे.

पुण्याचा कचरा मोशीत आणण्यासाठी छुपा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय पुणे महापालिका एवढे धाडस करणार नाही. परंतु, मोशीकरांच्या भावना तीव्र असल्यामुळे आपलाही विरोध असल्याचे दाखविण्यापलिकडे स्थानिक आमदारांना पर्याय राहिला नाही. त्यातून सफारी पार्कचे खुळ पुढे आणण्यात आले, असा आरोपही लांडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.