Bhosari crime News : खंडणीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज – खंडणीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणा-या एका सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोमवारी (दि. 4) अटक केली.

साहिल उर्फ साईनाथ वसंत धोतरे (वय 21, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस गस्त घालत असताना पोलीस शिपाई विजय दौंडकर यांना माहिती मिळाली की, दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी साहिल धोतरे टेल्को रोड, भोसरी येथे विजय सेल्सच्या समोर थांबला आहे.

त्यानुसार, पोलिसांनी विजय सेल्स परिसरात सापळा लावून साहिल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सन 2018 साली खंडणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस कर्मचारी शरद गांधीले, विजय दौंडकर, करण विश्वासे, अनिल जोशी, विशाल काळे, रहीम शेख यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.