Bhosari : भोसरीकर कुणाच्या बाजूने ? भाजप की पुन्हा अपक्ष ?

भोसरीमध्ये 59 टक्के मतदान, दोन टक्क्यांनी मतदान घटले

एमपीसी न्यूज – मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून अपक्षांच्या बाजुने कौल देणा-या भोसरी मतदारसंघातील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. यंदा 59 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भोसरीतील मतदानाचा घसरलेला टक्का कोणाला मारक आणि कोणाला पूरक ठरणार ? याबाबत तर्क-विर्तक लढविले जात आहेत.

भोसरी मतदारसंघात एक लाख 99 हजार 493 स्त्री आणि दोन लाख 41 हजार 601 पुरुष आणि इतर 53 असे चार लाख 41 हजार 125 मतदार आहेत. 411 मतदान केंद्रावर सोमवारी (दि. 21) मतदान त्यापैकी सुमारे पावणे दोन लाख मतदारांनी आपला हक्क बजाविला आहे. गुरुवारी (दि. 24) मतमोजणी असून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या टक्केवारीची आकडेमोड करण्यात येत आहे.

भोसरी मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. 2009 मध्ये अपक्ष लढलेले विलास लांडे निवडून आले. तर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे अपक्षच बाजी मारली. भोसरीकरांनी सलग दोनवेळा अपक्षांच्या बाजुने कौल दिल्याने यावेळी विलास लांडे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत अपक्ष निवडणूक लढणे पसंत केले. तर, महेश लांडगे यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर आपले नशीब आजमावले आहे.

भोसरीमध्ये 59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागीलवेळी पेक्षा दोन टक्क्यांनी मतदानामध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे मतदानाचा घसरलेला टक्का कोणाला मारक आणि कोणाला पूरक ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोसरीकरांनी पुन्हा अपक्षाला साथ दिली आहे की कमळाला हे गुरुवारी (दि. 24) स्पष्ट होणार आहे.

भोसरी मतदार संघातील मतदानाचा टक्‍का
वर्ष – टक्केवारी
2009 – 48.17
2014 – 60.89
2019 – 59.00

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.