Bhosari : ‘भांडण का सोडविले?’ म्हणत दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – मित्राचे भांडण सुरू असल्याने दोन मित्रांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. त्या कारणावरून मित्रासोबत भांडण करणाऱ्या दोघांनी ‘भांडण का सोडवले’ असे म्हणत भांडण सोडवणा-या दोघांना दगडाने आणि रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी रामनगर, बोपखेल येथे घडली.

राहुल मारुती गायकवाड (वय 33, रा. रामनगर, बोपखेल), श्याम जोगदंड अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी राहुल यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितेश तेजी (रा. रामनगर, बोपखेल), योगेश (पूर्ण नाव माहिती नाही, रा. खडकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी राहुल आणि त्यांचे मित्र रामनगर येथील बौद्ध विहारापासून नदीकडे झाडाखाली सावलीला बसण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांचा मित्र रवी वडमारे याच्या घरासमोर भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी राहुल आणि त्यांचे मित्र गेले.

भांडण सोडवत असताना ‘तू आमची भांडणे का सोडवतोस’ असे म्हणत आरोपी नितेश याने दगडाने राहुल यांना मारले. तर आरोपी योगेश याने लोखंडी रॉडने श्याम यांना मारले. यात राहुल आणि श्याम जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.