Bhosari : पत्नीच्या डोक्‍यात फरशी घालून खून

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा डोक्‍यात फरशी घालून खून केला. ही घटना भोसरी येथे सोमवारी सायंकाळी घडली.

कावेरी अतिष काळे (वय 25, रा. गुळवे वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती अतिष ऊर्फ पप्पु काळे हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कावेरी आणि अतिष यांच्यात भांडण झाले. त्यावेळी संतापलेल्या पतीने कावेरी यांच्या डोक्‍यात फरशी टाकली. यामुळे कावेरी या रक्‍ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्या. त्यानंतर आरोपी पळून गेला.

याबाबत माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कावेरी यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. यातील फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही मजूर आहेत. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.