BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: भोसरीच्या मैदानात उतरणार, यात तिळमात्र शंका नाही; सभागृह नेते एकनाथ पवार यांनी थोपटले दंड

एमपीसी न्यूज – मागील तीस वर्षाच्या काळात पक्षाबरोबर संघर्षात घालविली आहेत. त्या काळात केलेल्या कामाचे फळ निश्चित मला मिळेल. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून माझा कायम दावा आहे. जनतेच्या आशीर्वादाने भोसरीच्या मैदानात मी उतरणार, यात तिळमात्र शंका नाही, असे सांगत सभागृह नेते एकनाथ पवार यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.

भोसरीचे मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. भोसरी मतदारसंघावर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. दोन्ही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या असून इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु आहे.

भाजपकडून आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, रवी लांडगे, पक्षाचे सरचिटणीस प्रमोद निसळ तर शिवसेनेकडून कामगार नेते इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट इच्छूक आहेत.

विधानसभा निवडणूक लढविण्याची भूमिका सांगताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ”मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रमाणिकपणे निभावणार आहे. मागील तीस वर्षाच्या काळात पक्षाबरोबर संघर्षात घालविली आहेत. त्या काळात केलेल्या कामाचे फळ निश्चित मला मिळेल. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून माझा कायम दावा आहे. जनतेच्या आर्शिवादाने भोसरीच्या मैदानात मी उतरणार, यात तिळमात्र शंका नाही”.

HB_POST_END_FTR-A2

.