BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : नऊ मोबाईल क्रमांकावरून महिलेस अश्‍लिल फोन करणाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावरून महिलेस फोन करून अश्‍लिल बोलणाऱ्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

याबाबत 29 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 21) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9077603517, 8350093360, 9077840867, 9735658266, 9077633021, 9077377234, 9144807118, 9089610335 आणि 9077840867 या मोबाइलधारकांच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 20 जानेवारी दरम्यान अज्ञात आरोपीने वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी महिलेस वारंवार फोन करून अश्‍लिल बोलून महिलेचा विनयभंग केला. महिलेने याप्रकरणी पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like