Bhosari : गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. ही कारवाई सोमवारी (Bhosari) (दि. 18) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.
पोलिसांनी 55 वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्यासह तिचा साथीदार सोनू उर्फ अजय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या ताब्यात गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या घरात छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 52 हजार 750 रुपये किमतीचा दोन किलो 110 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला.
Pimpri : पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले
तिने हा गांजा सोनू याच्याकडून आणला असल्याचे चौकशीत समोर आल्याने सोनू (Bhosari) विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.