Bhosari : गटार तुंबविल्यावरुन तिघींची महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – गटार तुंबवित असल्याचा जाब विचारल्याने चिडलेल्या तीन महिलांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच महिलेच्या डोक्यात वीट मारली. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास भोसरीतील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत घडली.

याप्रकरणी जनाबाई शिवाजी खंदारे, इंदुबाई खंदारे आणि आशाबाई शिरसट (तिघी रा. महात्मा फुलेनगर, झोपडपट्टी भोसरी)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कांताबाई रामकिसन खंदारे (वय 58) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कांताबाई यांच्या घरासमोरील बोळीमध्ये 25 फेब्रुवारी रोजी जनाबाई खंदारे गटार तुंबवित होत्या. कांताबाई यांनी गटार का तुंबविले असे विचारले असता चिडलेल्या जनाबाई, इंदुबाई खंदारे, आशाबाई सिरट यांनी कांताबाई यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर, जनाबाई यांनी बोळीतील वीट कांताबाई यांच्या डोक्यात मारली, असे पोलिसांनी सांगितले. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.