Bhosari : न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला लुटले

एमपीसी न्यूज – इव्हेंटमध्ये काम देण्याच्या बहाण्याने महिलेकडून तिचे न्यूड फोटो घेतले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या खात्यातील 90 हजार रुपये काढून घेतले. ही घटना पिंपरी चौक आणि कासारवाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वीरेंद्र सिंह मँथाँन (वय 23, रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून ते 27 ऑगस्ट या कालावधीत आरोपी वीरेंद्र याने महिलेशी ओळख करून तिला इव्हेंटमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले. काम देण्याच्या बहाण्याने महिलेचे न्यूड फोटो व्हाट्सअपवर मागून घेतले. महिलेने फोटो दिल्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी महिलेचे एटीएम कार्ड व पासवर्ड जबरदस्तीने घेतले. त्याआधारे महिलेच्या बँकेतून 90 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतरही आरोपीने पीडित महिलेच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.