Bhosari : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करत पायाचा चावा घेतला. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास बोपखेल येथे घडली.

आकाश रमेश वैराट (वय 19, रा. बोपखेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश पंडीत वैराट (वय 32, रा. बोपखेल) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरासमोर उभे होते. त्यावेळी आरोपीने ‘तू माझ्याकडे का पाहतो’ असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या पायाला चावा घेऊन जखमी केले. ‘तू पोलिसात तक्रार केली तर तुझ्याकडे पाहून घेईल’ अशी आरोपीने फिर्यादी यांना धमकी दिली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.