Bhosari : दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण

Young man beaten for not paying for alcohol : तरुणाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

0

एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुणाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ही घटना 27 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता धावडेवस्ती, भोसरी येथे घडली आहे.

काळूराम शंकर चव्हाण (वय 30, रा. दिघी रोड, गवळीनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी पप्पू गवळी (रा. दिघी रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे 27 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास धावडेवस्ती येथील हवेली हॉटेल समोर थांबले होते. त्यावेळी आरोपी पप्पू तिथे आला. त्याने चव्हाण यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून पप्पू याने चव्हाण यांच्या दोन्ही पायांवर दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. यात चव्हाण यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.

त्यानंतर पप्पू याने चव्हाण यांच्या मित्रांना देखील शिवीगाळ व दमदाटी केली. चव्हाण यांच्या मित्रांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर फिर्याद देण्यात आली आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like