Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार (दि. 21) सायंकाळी सहाच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

कृष्णा गणेश भोसले उर्फ दाद्या (वय 22, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी फिर्यादी महिला आणि त्यांचा भाचा किराणा दुकानात व भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी यांना तुझ्या भाच्याला नीट समजावून सांग असे म्हटले. त्यामुळे फिर्यादी महिला भाच्याला समजावून सांगत असताना आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.