Bhosari : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा (Bhosari) एकच्या तपास पथकाने एका तरुणाला घरगुती गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हि कारवाई पोलिसांनी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत केली.

परमेश्वर दयानंद माने (वय 26, रा.भोसरी, मुळ देवणी लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाला भोसरी परिसरात एकजण नागरिकांच्या जिवितीला धोका निर्माण करत घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी  भोसरी येथील भगवतवस्ती मधील लक्ष्मी गॅस इंटरप्रायजेस दुकानातून आरोपीला ताब्यात घेतले.

Nigdi News : प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाचा पडदा कधी उघडणार?

दुकानाची तपासणी केली असता मोठ्या गॅसच्या टाकीतील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून त्यांची विक्री करत होता. आरोपीकडून पोलिसांनी 10 घरगुती गॅसच्या टाक्या व 28 लहान टाक्या असा एकूण 38 गॅस टाक्या, 2 गॅस, विड्रॉल मशीन, एक वजन काटा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari) गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.

हि कारावाई गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, विशाल भोईर, मारुती जायभाय, स्वप्नील महाले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.