Bhosari : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. तरुणाकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली.

रोहन सहदेव पाषणकर (वय 23, रा. नांदे म्हाळुंगे रोड, म्हाळुंगे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत पथकातील पोलीस शिपाई सावन राठोड यांना माहिती मिळाली की, एक इसम भोसरी मधील पीसीएमसी बस स्टॉप वर थांबला असून त्याच्या कमरेला पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून रोहन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि त्यामध्ये एक जिवंत काडतूस असा 25 हजार 500 रुपयांचा ऐवज मिळून आला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीवर आर्म  ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, प्रमोद लांडे, सावन राठोड, महेंद्र तातळे, सचिन मोरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.