BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : शौचास वेळ लागल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

210
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – शौचालयात नैसर्गिक विधी करण्यासाठी उशीर लागल्याने तरुणाला मारहाण केली. ही घटना भगतवस्ती भोसरी येथील वैष्णवी इंजिनिअरिंग या कंपनीत बुधवारी (दि. 13) रात्री घडली.

शशिकांत मुकींदराव बिराजदार (वय 26, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वैष्णवी इंजिनिअरिंग कंपनीत काम करतात. बुधवारी रात्री शशिकांत नैसर्गिक विधीसाठी शौचालयात गेले. शौचालयातून बाहेर आले असता बाहेर थांबलेल्या आरोपीने त्यांना अडवले. आरोपीने त्याच्या काही साथीदारांना बोलावून फिर्यादी यांना ‘शौचालयात एवढा वेळ काय करत होतास’ असे म्हणून मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या भावाला देखील मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3