Bhosari : सिगारेटच्या पैशांवरुन वाद, सिमेंटच्या ब्लॉकने तरुणाला मारहाण

दोघांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – सिगारेटचे पैसे देण्यावरुन झालेल्या भांडणातून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. भोसरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 23) रात्री साडेनऊच्या सुमारास भोसरीतील शास्त्री चौक येथे घडला.

दत्तात्रय राजेंद्र धायगुडे (वय 26, रा. लोणी काळभोर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर कासारवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी किरण पवार, प्रमोद वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले असून अजय चव्हाण, किशोर पवार यांच्यासह त्यांचे चार साथीदार असे सहा जण पसार आहेत. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषीकेश सुरेश पवार (वय 21 रा. लोणी काळभोर) यांने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसरीतील शास्त्री चौकत आरोपी अजय चव्हाण याची पानटपरी आहे. फिर्यादी आणि जखमी शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास टपरीवर सिगारेट घेण्यासाठी गेले होते. त्यावळी सिगारेटच्या पैशांच्या कारणावरुन आरोपी आणि जखमी तरुणामध्ये वाद झाला. त्यावरुन आरोपींनी दत्तात्रय याला मारहाण करत गंभीर जखमी केले, असे भोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.