Bhosari : पोहण्याच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या पोहण्याच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी येथे सोमवारी (दि. 18) दुपारी घडली.

अमोल एकनाथ कळसकर (वय 26, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अमोल आपल्या नातेवाईक तरुणांसोबत पोहण्यासाठी महापालिकेच्या तलावावर आले. अमोल यांना फीट आल्याने ते पाण्यात बुडाले. यामुळे जीवरक्षक आणि नातेवाईक तरूणांनी त्यास त्वरित पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.