Bhosari : नाशिक फाटा येथे ट्रॅव्हल्सच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून (Bhosari) जाणाऱ्या तरुणाला खासगी ट्रॅव्हल्स बसने मागून जोरदार धडक दिली ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.25) पहाटे घडली.

शुभम ज्ञानेश्वर पवार (वय 22, रा.आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी अमोल संभाजी पवार (वय 38, रा.वाल्हेकरवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रॅव्हल्स क्रं. ए.आर.01 जे 6036 वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची‌ सरपंचांसोबत ‘लंच पे चर्चा’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत भाऊ शुभम हे दुचाकीवरून आकुर्डी येथून नाशिक फाटा मार्गे भोसरीच्या दिशेने जात होते. यावेळी आरोपीने (Bhosari) त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स बेदरकारपणे चालवून शुभमच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

यामध्ये शुभम जखमी झाला. मात्र, आरोपीने थांबून मदत न करता तो थेट तेथून पळून गेला. यात शुभम जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.