BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : कामगार तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कामासाठी ठेवलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना जुलै ते 11 सप्टेंबर 2019 या कालावधीत घडली.

अमितकुमार सुरेन्द्रप्रसाद तत्त्वा (वय 23, रा. एमआयडीसी भोसरी, मूळ रा. बक्सार, राज्य – बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमितकुमार याला पीडित मुलीच्या घरी कामासाठी ठेवले होते. जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मुलगी दोन महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3