Bhosari crime News : रस्त्यालगत पार्क केलेली 14 लाखांची इनोव्हा चोरीला

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्यावर ल्रॅाक करून पार्क केलेली 14 लाखांची इनोव्हा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान मोशी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी मल्हारी लक्ष्मण बो-हाडे ( वय 39, मोशी प्राधिकरणं, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बो-हाडे यांची एमएच 14 एचजी 3459 ही चौधा लाख किंमतीची इनोव्हा चारचाकी गाडी सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केली असताना अज्ञात चोरट्याने चोरूंन नेली आहे.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.