Bhosari:  भोसरीगाव पुढील तीन दिवस  पूर्णपणे  ‘लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी आणि आज गुरुवारी  कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस भोसरीगाव पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पूर्णपणे भोसरीगाव लॉकडाऊन करण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भोसरी परिसरात देखील कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भोसरीकरांनी एकमताने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीगाव शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पूर्ण  लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, शहरात 10 मार्चपासून  आजपर्यंत 22  रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बारा बरे झाले आहेत. 10 सक्रिय बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. महापालिकेने खबरदारी म्हणून शहरातील काही भाग सील देखील केला आहे.

 ”शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भोसरीगाव बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी असे तीन दिवस पूर्णपणे भोसरीगाव लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या निर्णयाला गावकऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या निर्णयाचे पालन करावे.  कोणीही घराबाहेर पडू नये. या काळात सर्व दुकाने बंद राहतील. सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे व घराबाहेर पडू नये”.  महेश लांडगे : आमदार -भोसरी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.