Bhosri Crime : कोयता दाखवत तरुणाला केली मारहाण; जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : भोसरीमध्ये (Bhosri Crime) 25 जून रोजी 4 जणांनी मिळून एकाला शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिली. याबाबत अजय गायकवाड (वय 16 वर्षे, शांतीनगर, भोसरी याने फिर्याद दिली आहे.

निखिल कसबे (वय 22 वर्षे, रा. शांतीनगर), रोहित तुपरे (वय 22 वर्षे, रा. आदिनाथनगर), वैजनाथ राजभर (वय 17 वर्षे, धावडेवस्ती), सुरज कुमार (वय 17 वर्षे, रा. इंद्रायणीनगर) हे आरोपी असून त्यांच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 323, 504, 506, 34 मपोका 37(1) सह 136, आर्म ऍक्ट 4(25) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Rural Crime : खालबूरेमध्ये मेडिकलच्या दुकानातून 86 हजाराची चोरी

25 जून रोजी रात्री 7.30 वाजेचे सुमारास आखाडा मैदानाजवळ, कुस्ती मैदानाच्या समोर, भोसरी येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून संगणमत करून फिर्यादी याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच, हातात कोयते घेऊन फिर्यादी व त्यांचा भाऊ काळुराम गायकवाड (Bhosri Crime) यांना आरोपींनी धमकी दिली, कि त्यांच्या नादी लागलात तर वाईट परिणाम होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.