Bhosri : चोरांनी तरुणाला मारहाण करत मोबाईल चोरला

एमपीसी न्यूज – मोबाईल चोरून नेताना तरुणाने (Bhosri) चोरट्यांचा प्रतिकार केला असता चोरट्यांनी दगडाने मारहाण करत तरुणाला जखमी केले आहे. हि घटना शुक्रवारी (दि.5) पहाटे साडे चार वाजता भोसरीतील आळंदी रोड येथे घडली.

अक्षय अनिल चौधरी (वय 21 रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangvi : बायकोवरील चारित्र्याच्या संशयावरून एकावर चाकूने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी चालत जात असताना आरोपी हे मागून दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. यावेळी फिर्यादी यांनी चोरांचा पाठलाग करत चोरट्यांना धक्का देऊन पाडले असता, त्यातील एकाने दगडाने फिर्यादी यांच्या डोक्यात व कानावर वार केले. फिर्यादी यांचा 8 हजार रुपयांचा फोन चोरून नेला. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.