pimpri chinchwad : भूगोल फाउंडेशनतर्फे देवगिरी किल्ल्यावर स्वछता मोहीम

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा दिला संदेश

एमपीसी न्यूज – पुणे येथील भूगोल फाउंडेशन संस्था आणि संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ यांनी नुकतेच किल्ले देवगिरी (दै्ालताबाद), वेरूळ, घृष्णेश्वर, खुलताबाद येथे दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण आणि पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित लोकसहभागातून भूसंवर्धनाकडे प्लॅस्टिमुक्त किल्ला आणि प्लॅस्टिकमुक्त आपले शहर, गाव, वृक्षसंवर्धन, स्थानिक लोकांमध्ये जनजागृती, प्रबोधन ही मोहीम राबविली आहे.

भूगोल फाउंडेशनने सर्वप्रथम दै्ालताबाद शहरात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृती करत परिसरात आलेल्या पर्यटकांमध्ये पत्रके वाटली. याचवेळी स्थानिक लोकांना पर्यावरण आणि स्वच्छता याविषयी भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल वाळुंज यांनी प्रबोधन केले. यावेळी संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, अन्नसेवा समिती अै्ारंगाबाद, पुरातत्त्व विभाग भारत सरकार आणि इतर सामाजिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या. गड परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली. पर्यावरण रक्षण व्हावे, ऎतिहासिक वास्तुचे जतन व्हावे, या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली.

याकामासाठी पुरातत्त्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी संजय रोहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्वच सहकारी यांच्या सहकार्याने गडावर  स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत ३९ पोती प्लॅस्टिक आणि थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला.

यावेळी पुरातत्त्व विभागाचे सीताराम धनायत आणि सत्यनारायण डायमा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निकुंज रेंगे, बाळासाहेब गरुड, गणेश चै्ाधरी, अविनाश खोसे, सुनील बांगर, सुहास चव्हाण, अरविंद देवकर, संजय चव्हाण, प्रदिप चै्ाधरी, दिपक जगझाप आणि त्यांचे सहकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

संतनगर मित्र मंडळाचे साहेबराव गावडे, कामगार नेते हनुमंत लांडगे, कर्नल तानाजी अरबुज, शशिकांत वाडते, चंद्रकांत थोरात, विशाल शेवाळे, आदेश गरूड, विजय सुतार तसेच इंद्रायणी सेवा संघाचे हभप सतीश महाराज वाळुंज, विठ्ठल लंघे, सत्यवान जाधव, गोरक्ष आदक आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. तसेच अन्न सेवा समिती अै्ारंगाबाद येथील संस्थेचे अनंत माटोळे, आनंद लोमकर, दिलीप आसबे, चंद्रकांत वाजपेयी, पूजा सोनवणे, जया पाटील आणि त्यांचे इतर सहकारी सहभागी झाले होते. त्याचबरोबर  याप्रसंगी अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.

 

आमची ही मोहीम विशेष मोहीम असते. कारण आमची काम करण्याची पद्धत वेगळी असुन समाजात एक वेगळा संदेश देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी रॅलीचे आयोजन करतो. यामध्ये आम्ही स्थानिक लोक, वनविभाग, पुरातत्त्व विभाग, इतर सामाजिक संस्था यांचा सहभाग यामध्ये समाविष्ट करतो. “आधी केले मग सांगितले” असे कृतीयुक्त काम तसेच आपण समाजाचे, निसर्गाचे, मानवतेचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून तरी पुढे येऊन अशा कामात प्रत्येकानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी झाले पाहिजे
– विठ्ठल (नाना) वाळुंज, ज्येष्ठ मार्गदर्शक, भूगोल फाउंडेशन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.