Bhuj – The Pride of India: ‘भूज – द प्राइड ऑफ इंडिया’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'Bhuj - The Pride of India' is coming soon

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – सध्या चीन लडाख सीमेवर भारताची कुरापत काढत आहे. याआधीही चीनने भारताशी युद्ध केले होते. पण त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात फरक आहे. अशीच युद्धे भारताला पाकिस्तानबरोबर करावी लागली आहेत. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असलेला एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगण ‘भूज – द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट घेऊन येत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लूक शेअर केल्यामुळे आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. हा एका सत्य कथेवर आधारित चित्रपट आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील ३०० महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे.

अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण देशभरात सिनेमागृह बंद असल्यामुळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा शौर्यावर आणखी चित्रपट बनवले जाणे आवश्यक आहे असे अजय देवगणने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले होते. जुलैच्या सुरुवातीलाच डिस्नी प्लस हॉटस्टारने सात मोठ्या चित्रपटांच्या डिजिटल प्रदर्शनाची घोषणा केली होती.

नुकताच या चित्रपटातील सोनाक्षीचा फर्स्ट लूक डिस्नी प्लस हॉटस्टारच्या इन्स्टाग्रामवरुन रिलीज झाला आहे. यात ती सुंदरबन जेठा माधरपार्यच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘सुंदरबन जेठा माधरपार्य बनलेल्या सोनाक्षी सिन्हाचा हा पहिला लूक आहे. ती एक महान लढाऊ बाण्याची स्त्री असून तिने परिसरातील 299 महिलांना एकत्र आणून भारतीय सैन्याला मदत केली. भूज – प्राइड ऑफ इंडिया ही इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टारमध्ये येणार आहे.

या युद्धात सुंदरबन यांनी हवाई दलाच्या जवानांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात मदत करण्याठी सुमारे 299 महिलांना धावपट्टी बांधण्यासाठी प्रोत्साहित केले जेणेकरुन सर्व सैनिक उड्डाण करुन सुरक्षित राहू शकतील.

हा चित्रपट 1971 च्या भारत-पाक युद्धाची कहाणी आहे. जो भूज एअरबेसच्या प्रभारी स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांच्यावर आधारित आहे. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब फेकले जात होते असे असूनही विजय कर्णिक यांनी एअरबेस चालू ठेवून ताब्यात घेतला. तसेच यात संजय दत्त यांनी रणछोडदास पागी यांची महत्वाची भूमिका साकारली आहे. या युद्धामध्ये 50 आयएएफ आणि 60 डिफेंस सिक्योरिटीचे सामिल होते.

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.