Pimpri : पिडीत मुलींच्या कुटुंबास भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली भेट 

एमपीसी न्यूज  – भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कासारसाई येथील बलात्कार पिडीत दोन अल्पवयीन मुलींच्या पालकांची भेट घेतली.

_MPC_DIR_MPU_II

काही दिवसांपूर्वी कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांच्या मुलांनी या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारचा गंभीर गुन्हा केला होता.

या घटनेच्या निषेधार्थ भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी भेट घेतली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिकारी शिरीष जाधव यांना मागण्यांचे निवेदन दिले. आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे शोधून आरोपींना फास्ट-ट्रॅक कोर्टातुन लवकरात लवकर फाशी व्हावी याकरिता सबळ पुरावे शोधण्याचे तसेच पिडीत मुलींच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळावा आणि त्या वस्ती वर महिला पोलीस तैनात करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देसाई यांनी दिले. वेळी आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1