Vadgaon Maval : कल्हाट येथे ग्रामसचिवालयाचा भूमीपूजन कार्यक्रम संपन्न  

0

एमपीसी न्युज  : पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभाताई सुदामराव कदम यांच्या फंडातून मंजूर झालेले कल्हाट गावातील ग्रामसचिवालयाचे भूमीपूजन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई कदम यांचे हस्ते करण्यात आले.

मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार  सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाने टाकवे – वडेश्वर मतदार संघात काम करत आसताना कल्हाट गावातील ग्रामसचिवालयाप्रमाणे इतर सर्वांगीण विकासकामे करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे मनोगत सदस्या कदम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. शोभाताई कदम यांचा सत्कार गावच्या वतीने सरपंच  बिजाताई जाचक यांनी केला.

याप्रसंगी उपस्थित  हभप रोहिदास महाराज धनवे, संघटन मंत्री नारायण ठाकर , सरचिटणीस सुदाम कदम, उद्योजक अनिल मालपोटे, विभाग अध्यक्ष दिगंबर आगिवले, सरपंच बिजाताई जाचक , पोलीस पाटील  सारिका थरकुडे, उपसरपंच जावेद मुलानी, माजी सरपंच गणेश कल्हाटकर, भोयरेचे सरपंच बळीराम भोईरकर , माजी आध्यक्ष शेखर मालपोटे,माजी उपसरपंच भिकाजी भागवत, माजी चेअरमन अनिल जाधव , सरचिटणीस माणिक तांबोळी, माजी चेअरमन चंद्रकांत घोलप, माजी उपसरपंच बबन आगिवले, माजी सरपंच तानाजी करवंदे , माजी सरपंच मनोज करवंदे, माजी सरपंच शंकर थरकुडे , नवनाथ कल्हाटकर, माजी सरपंच गोपाळ पवळे, ग्रा.प.सदस्य बुधाजी जागेश्वर , सरपंच बबुशा भांगरे , उद्योजक नवनाथ शिंदे , शिवाजी करवंदे, अंकुश पवार, गोविंद तांबोळी , दत्ताशेट पवार , बारकू वायकर, अनिल करवंदे,  राजू पवार , काळूराम पवार , ग्रामसेवक जाधव, कॉन्ट्रक्टर काटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.