Pune : घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन 

एमपीसी न्यूज – घोरपडी येथील पुणे–सोलापूर तसेच पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण प्रकाश जावडेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे , आमदार दिलीप कांबळे, नॅशनल शिपिंग बोर्ड अध्यक्ष प्रदीप रावत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित राहणार आहे,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.