Talegaon Dabhade News : सुदुंबरे येथील बंदिस्त गटर योजना कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्याचे आमदार  सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून 2515 अंतर्गत फंडातून मंजूर करण्यात आलेल्या सुदुंबरे येथील बंदिस्त गटर योजना कामाचे “भूमिपूजन समारंभ” रविवार (दि 21) रोजी आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या हस्ते नारळ वाढवून संपन्न झाला.

यावेळी सुदूंबरेगावचे माजी आदर्श सरपंच माणिक गाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजीराव गाडे,माजी उपसरपंच जालिंदर गाडे, सुदुंबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष गाडे,माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गाडे, माजी उपसरपंच बापूसाहेब दरेकर, माजी उपसरपंच ताराचंद गाडे, माजी उपसरपंच विश्वनाथ(बाळा) आंबोले,गणेश गाडे, माणिक गाडे,संदीप गाडे, ग्रामपंचायत सदस्या  कांताबाई गाडे, ग्रामपंचायत सदस्या उमा शेळके,सारिका सुर्वे,चांगुना गाडे, प्रल्हाद चव्हाण,सोमनाथ गुंजाळ, स्वप्निल बेल्हेकर, संजय कसबे व सुदूंबरे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यांनी विशेष प्रयत्नातून 2515 अंतर्गत फंडातून बंदिस्त गटर योजनेच्या कामासाठी निधी दिल्याने    ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.