pimpri chinchwad : भूमकर व कुदळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल विधानसभाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (ओबीसी सेल) चिंचवड विधानसभाध्यक्षपदी सुनील भूमकर यांची तर पिंपरी विधानसभाध्यक्षपदी ईश्वर कुदळे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पद नियुक्ती पत्र देण्यात आले. सांगवी येथील निळूभाऊ फुले नाट्यगृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्या बैठकीत हे पत्र देण्यात आले. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष अॅड. चंद्रशेखर शिवाजी भुजबळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.