Lonavala : भुशी धरणावर लोटला पर्यटकांचा जनसागर 

एमपीसी न्यूज – पर्यटकांची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर आज पर्यटकांचा जनसागर लोटला होता. सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने धरणाच्या पायर्‍यांवर उभे राहण्यास देतील जागा शिल्लक राहिली नव्हती.

भुशी धरणाप्रमाणेच सहारा पूल धबधबा, खंडाळ्यातील राजमाची पॉइंट, पवना धरण, भाजे लेणी, कार्ला लेणी, लायन्स पॉइंट या सर्वच पर्यटनस्थळांवर आज दिवसभर पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. सकाळपासूनच भुशी धरण व लायन्स पॉइंट परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर देखील दिवसभर कायम असल्याने धरण व धबधब्याखाली भिजण्यासोबत रस्त्याने पायी चालणाऱ्या पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद घेतला.

पर्यटकांची सुरक्षा व वाहतूक नियोजनाकरिता लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आ। पाटील यांच्यासह सुमारे शंभर पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात होते. सायंकाळी उशिरापर्यंत भूशी धरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांचा जोर कायम होता. पर्यटकांची व वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र योग्य पार्किंगमुळे मार्गावर कोठेही कोंडी झाली नव्हती. वाहने संथगतीने मार्गस्त होत होती. वाहनांच्या संख्येपुढे पर्यटनस्थळाकडे जाणारे रस्ते अपुरे पडले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.