Bhushi Dam News: भुशी धरणात बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज: भुशी धरणात एका 19 वर्षीय तरुणाचा  मृत्यू  झाल्याची घटना रविवारी सांयकाळी ५ वाजल्याच्या सुमारास घडली आहे. सोहेल अहमदअली शेख असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. 

लोणवला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोहेल हा रविवारी भुशी धरणात उतरला होता. पाण्यात पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या दसऱ्याचा दिवशी हि घटना घडल्याने सगळीकडे हळ हळ व्यक्त होत आहे. पोलिस नाईक विजय मुंडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.