BNR-HDR-TOP-Mobile

Bibvewadi : रिक्षाचालक आगीच्या भक्ष्यस्थानी , नागरिक व्हिडीओ काढण्यात दंग

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – बिबवेवाडीमध्ये भारत ज्योती बस स्टॉप जवळ रिक्षाने (नं. mh12 kr 4668) अचानक पेट घेतला . बँकेच्या बोलेरो गाडी (नं.MH 12 KJ 4622 ) दिलेल्या धडकेत , सीएनजी मुळे रिक्षाने पेट घेतला . या घटनेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाले असून एक पॅसेंजर किरकोळ जखमी झाले आहेत . तात्काळ त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते .

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार , एका बँकेच्या जीपशी झालेल्या धडकेत रिक्षामध्ये स्पार्क झाल्याने , हि आग लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले . आगीची भीषणता अचानक वाढल्याने परिस्थितीवर नियंत्रण आणणे कठीण झाले . या घटनेमध्ये रिक्षा चालक  गंभीर जखमी झाले असून त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले आहे .

एकंदरीत परिस्थिती पाहता , घटना घडते वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रिक्षाचालक एकीकडे मरण यातना सहन करत असताना , जखमीला वाचवण्याचा प्रयत्न करणारे नागरिक कमी आणि घटनेचा व्हिडीओ काढण्यासाठी पुढाकार घेणारे नागरिक अधिक होते हि मात्र शोकांन्तिका !

HB_POST_END_FTR-A4

.