Bibvewadi: दोन चोरट्यांकडून तब्बल पावणेदोन लाखांचे मोबाइल जप्त

Bibvewadi: Two thieves arrested and seized Rs 1.75 lakhs mobile phones and two wheeler त्यांनी 22 मोबाइल चोरल्याचे मान्य केले. तसेच यासाठी वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. हा एकूण 1,85,850 रुपयांचा ऐवज आहे.

एमपीसी न्यूज- बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या दोन चोरट्यांकडून 22 मोबाइल आणि 1 दुचाकीसह तब्बल 1,85,850 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मनोज यल्लप्पा मुदगल (वय 39, डोबरवाडी, घोरपडी, पुणे) आणि धर्मा तिम्मा भद्रावती (वय 26, रा. सदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांना या दोघांना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी 22 मोबाइल चोरल्याचे मान्य केले. तसेच यासाठी वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. हा एकूण 1,85,850 रुपयांचा ऐवज आहे.

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलिस कॉन्स्टेबल डाके, लोधा, शितोळे, मोरे, महांगडे, शेलार, कोठावळे यांनी ही कारवाई कली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.