Bibwewadi News : इएसआयसी रुग्णालयात 90 ऑक्सिजन, 10 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध

एमपीसीन्यूज : पुण्यातील बिबवेवाडी येथील इएसआयसी अर्थात एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन रुग्णालय पुणे महापालिकेच्या वतीने कार्यान्वित केले आहे. या हॉस्पिटलमध्ये 100  बेड्स उपलब्ध केल्या आहेत. यात 90 ऑक्सिजन बेड्स आणि 10 व्हेंटिलेटर बेड्सचा समावेश आहे.

आज या रुग्णालयाच्या अंतिम तयारीचा आढावा घेतला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ आणि आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या रुग्णालयात आधीपासूनच उपलब्ध सुविधेबरोबरच आवश्यक सुविधांची पूर्तता पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. यात विविध कामे करण्यात आली आहेत. शिवाय डॉक्टरही उपलब्ध करुन देण्यात येत आहोत. तसेच या ठिकाणी आपल्याला 20  एमबीबीएस डॉक्टर्स उपलब्ध झाले आहेत.

या केंद्रावर पुणे महापालिकेच्या वतीने एका नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेची स्वतंत्र यंत्रणाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सुसज्ज आणि अत्यंत उत्तम पद्धतीचं एक तयार हॉस्पिटल सेवेत उपलब्ध झाले आहे.

वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता पुणे शहरात विविध माध्यमातून नव्याने बेड्स उपलब्ध करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याला काही प्रमाणात यशही येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.