Big B prayed to Vitthal Rakhumai : महानायकाचा विठ्ठल रखुमाईच्या चरणी दंडवत

Big B prayed to Vitthal Rakhumai

एमपीसी न्यूज – महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक करोनाची लागण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच सून ऐश्वर्या व नात आराध्या घरातच उपचार घेत आहेत. अमिताभ रुग्णालयातून आपल्या प्रकृतीची हालहवाल सोशल मिडियावरुन चाहत्यांना कळवत असतात. काल त्यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘देवाच्या चरणी समर्पित’. गेल्या दीड महिन्यादरम्यान अमिताभ यांनी या मंदिराचा फोटो सहा वेळा शेअर केला आहे. तसेच बुधवारी रात्री विदूर नीतीचे श्लोक देखील शेअर केले.

याशिवाय नेहमी दुःखी राहणा-या सहा लोकांबद्दल सांगितले. अमिताभ यांनी ब्लॉगसोबतच ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर लिहिले होते की…. ‘ईर्ष्यी घृणी त्वसंतुष्ट: क्रोधनो नित्यशड्कितः। परभाग्योपजीवी च षडेते दुखभागिनः।। म्हणजेच सर्वाची ईर्ष्या, घृणा करणारे, असंतोषी, क्रोधी, नेहमी संशय घेणारे आहे इतरांच्या आधारे जगणारे सहा प्रकारचे लोक नेहमी दुःखी असतात. अशा लोकांपासून दूर राहायला हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.