Big B wishes on behalf of Ekadashi – बिग बीं च्या एकादशीनिमित्त शुभेच्छा

Happy Ekadashi from Big B अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एमपीसी न्यूज – आज आषाढी एकादशी. वैष्णव भक्तीची परंपरा सांगणा-या महाराष्ट्रात हा दिवस अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची सुमारे सातशे वर्षांची परंपरा महाराष्ट्राने आजवर जपली आहे. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे लाखो वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. तरीदेखील वारीची परंपरा खंडित  होऊ नये म्हणून खास एस. टी. बसमधून विविध ठिकाणाच्या पादुका विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरला गेल्या.

शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह पहिल्यांदाच केली. त्यांनी करोनाचे संकट संपू दे असे विठुरायाला साकडे घातले. बॉलिवूडचे महानायक  अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील आषाढी एकादशी निमित्त चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी विठ्ठल रखुमाईचा फोटो शेअर करत मराठीतून छान कॅप्शन दिले आहे. ‘देवषयनी #आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना ,वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा !!’ असे त्यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.