Big Boss Marathi: लवकरच येतोय आपला मराठी ‘बिग बॉस’…

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व 15 एप्रिल 2018 रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

एमपीसी न्यूज – हिंदी ‘बिग बॉस’पासून प्रेरणा घेऊन मराठीत देखील ‘बिग बॉस’ सुरु झाला. मराठी ‘बिग बॉस’चे दोन सीझनदेखील झाले. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या अभिनेते अभिनेत्रींना वेगळ्या रुपात पाहायला नेहमीच आवडते. शिवाय या शोमध्ये भरपूर मालमसाला भरलेला असतो. यातील भांडणे, स्पर्धा घडवलेल्या असतात हे माहीत असूनसुद्धा प्रेक्षक त्याचा आनंद घेतात. त्यामुळे भांडण, द्वेष, प्रेम आणि स्पर्धा या सगळ्यांचे मिश्रण असलेल्या या रिअ‍ॅलिटी शोची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असणार हे काही वेगळे सांगायला नको.

‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बिग बॉसच्या घरात टास्क कसे रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बिग बॉसच्या घराच्या थीमविषयीसुद्धा उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व 15 एप्रिल 2018 रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. ही दोन्ही पर्व प्रचंड गाजली. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालकसुद्धा महेश मांजरेकरच असतील का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र दोन्ही पर्वातील त्यांचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना व स्पर्धकांना फार आवडलं. त्यामुळे या तिसऱ्या पर्वातही त्यांचीच वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे यामध्ये कोणकोणते स्पर्धक असतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व कधी सुरु होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हे पर्व सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन करत बिग बॉसच्या घरात जवळपास 15 स्पर्धक एकत्र कसे राहतील याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.