Pimpri : लग्नापूर्वीच सासरच्यांच्या भल्यामोठ्या मागण्या; पण लग्नादिवशी नवरा गैरहजर

एमपीसी न्यूज – लग्नापूर्वीच सासरच्या लोकांनी भल्यामोठ्या (Pimpri) मागण्या केल्या. त्याची पूर्तता करून देखील होणारा पती आणि त्याच्या घरचे लग्नासाठी हजर राहिले नाहीत. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी आणि पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात 3 मार्च ते 14 मे 2022 या कालावधीत घडला.

अक्षय प्रदीप कोतवडेकर (वय 28), प्रदीप पांडुरंग कोतवडेकर (वय 62), आदित्य प्रदीप कोतवडेकर (वय 27), वंदना प्रदीप कोतवडेकर (वय 56, रा. मोशी), किरण सुतार (वय 52, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नियोजित वधूने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Vadgaon News : वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक मेडिसिन डे साजरा

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे फिर्यादी (Pimpri) यांना पाहण्यासाठी आले. फिर्यादीला आरोपींनी पसंत केले. फिर्यादींसोबत साखरपुडा करून लग्नाची यादी ठरवून दिली. फिर्यादी यांच्या कुटुंबीयांनी यादीत ठरल्याप्रमाणे सर्व पूर्तता केली. तरी देखील आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या मागण्या केल्या.

शनिवारी (दि. 14 मे) पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात फिर्यादी यांचे लग्न होणार होते. मात्र आरोपींनी लग्नासाठी हजर न राहता फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक व अब्रुनुकसान केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.