Maval : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगडावर भव्य दीपोत्सव

एमपीसी न्यूज – शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे लोहगड किल्ल्यावरती त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव करण्यात आला. मंचातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शिवस्मारक ते गणेश दरवाजापर्यंत हा दीपोत्सव केला जातो.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य अलका धानीवले, सरपंच नागेश मरगळे, रमेश मामा बैकर, गणेश धानिवले, प्रवीण देशमुख हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात हजारो मशाली, पणत्या, टेंभे याचा वापर केला जातो. शिवस्मारक परिसर रांगोळी व फुलांनी सजवली जाते. सर्वत्र भगवे झेंडे लावून वातावरण पूर्ण शिवमय होते. सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी हा कार्यक्रम आनंदाने साजरे करतात. या कार्यक्रमाला शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीरजी थोरात यांनी मार्गदर्शन केले. गड संवर्धन गेली वीस वर्षे करत असल्यामुळे त्यांनी मंचाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

शिवाजी रायगड स्मारक मंडळाला या वर्षी 125 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या वर्षी शतक रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यामुळे सर्वांना सहभागी व्हायला सांगितले. तसेच शिव पुण्यतिथीला सर्वांनी रायगडला यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष संदीप गाडे, विश्वास दौंडकर, गणेश मुंडे, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर, अजय मयेकर, चेतन जोशी, नरेंद्र वाल्हेकर, राहुल वाघमारे, शिवतेज शेंडे, मंगेश रवने, संदीप भालेकर, गौरव गरवड यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद भैरवकर यांनी केले तर आभार गणेश उंडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.