Indian Captain : मोठी बातमी ! विराट कोहली कर्णधारपद सोडणार, रोहीत शर्मा नवा कर्णधार 

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या T20 विश्वचषकात नंतर विराट एकदिवसीय आणि T20 संघाचे कर्णधारपद सोडणार असून त्याजागी रोहित शर्मा यांच्यावर कर्णधार पदाची धुरा सोपवली जाणार आहे. 

सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधारपदी कायम राहणार आहे. मात्र, एकदिवसीय आणि T20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. T20 विश्वचषकात नंतर विराट कोहली स्वतः कर्णधार पद सोडल्याचे जाहीर करणार आहे.

मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीच्या कामगिरीवर फरक पडल्याचे दिसून येत आहे. आगामी T20 विश्वचषक आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक सामन्यासाठी विराटला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे असून, तो आपली कामगिरी सुधारण्यावर भर देणार असल्याचे सांगितले जात आहे.

विराट कोहली नंतर रोहित शर्मा कर्णधार पदासाठी योग्य असल्याचे मानले जात आहे. रोहित शर्माने आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाच वेळा आयपीएल जिंकले आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी. 

एकदिवसीय सामने – 95 पैकी 65 जिंकले

कसोटी सामने – 65 पैकी 38 जिंकले

T20 सामने – 45 पैकी 29 जिंकले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.