Pimpri : पीएमपीच्या पाच रुपयांत प्रवासाला मोठा प्रतिसाद

शहरात 'या' मार्गावरुन धावतात बस

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलकडून सुरु केलेल्या  पाच किलोमीटरसाठी पाच रुपयांत प्रवास या अटल बससेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  योजनेअंतर्गत पुण्यात 37 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 16 अशा 53 मार्गांवर 143 बस धावत आहेत. त्यातील 33 बस शहरातील 16 मार्गांवर धावत आहेत. तसेच, शहरात सहा वर्तुळ मार्गही पीएमपीने सुरू केले आहेत. 25 ऑक्‍टोबरपासून ही योजना सुरू केली आहे.

पाच किलोमीटरसाठी पाच रुपयांत प्रवासाचे बसचे मार्ग !

# पिंपरीरोड ते पवारवस्ती चिखली
# पिंपरीरोड ते काळेवाडी फाटा
# पिंपरीगाव ते चिंचवडगाव
# चऱ्होलीगाव ते आळंदी
# भोसरी ते दिघी
# भोसरी ते आरटीओ
# संतनगर ते भोसरी
# देहूरोड ते देहूगाव
# चिंचवड स्टेशन ते डांगे चौक
# निगडी ते रुपीनगर

…असे आहेत वर्तुळ मार्ग!
#पिंपरीरोड ते पिंपरी रोड – एचए, वल्लभनगर, संत तुकारामनगर, वायसीएम, मासुळकर कॉलनी, मोरवाडी
# पिंपरीरोड ते पिंपरी रोड – मोरवाडी, मासुळकर कॉलनी, वायसीएम, संत तुकारामनगर, वल्लभनगर, एचए
# चिंचवडगाव ते चिंचवडगाव – केशवनगर, तापकीरनगर, काळेवाडी फाटा, वाकड फाटा, डांगेचौक
# चिंचवडगाव ते चिंचवडगाव – डांगेचौक, वाकड फाटा, काळेवाडी फाटा, तापकीरनगर, केशवनगर
# आकुर्डी स्टेशन ते आकुर्डी स्टेशन -डी. वाय पाटील कॉलेज, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, संभाजीनगर
# आकुर्डी स्टेशन ते आकुर्डी स्टेशन – संभाजीनगर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, डीवाय पाटील कॉलेज

 पिंपरीरोड वर्तुळमार्ग!
# पिंपरी रोड –  एचए कंपनी, वल्लभनगर एसटी स्टॅंड, संत तुकारामनगर, वायसीएम हॉस्पिटल, नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी रोड. उलट याच दिशेने जाणारी दुसरी बस. पाच रुपयांत थेट सेवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.