Pune Crime : दिवेघाटातील ‘त्या’ अपहरण नाट्यात मोठा खुलासा, तरुणीनेच रचला स्वतःच्या अपहरणाचा कट

एमपीसी न्यूज – शनिवारी (दि. 3 ऑक्टो.) सकाळी दिवे घाटात एका तरुणीचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी चार चाकीमधून आलेल्या काही तरुणांनी धाक दाखवून तिचे अपहरण केले होते. परंतु या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला असून प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी त्या तरुणीनेच स्वतःच्या अपहरणाचा कट रचल्याचे उघड झाले आहे.

शनिवारी सकाळी ही तरुणी चुलत भावासोबत पुरंदर तालुक्यातील आपल्या मूळ गावी निघाली होती. दिवेघाटात पोहोचल्यानंतर चार चाकीतून आलेल्या काही तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली आणि कोयत्याचा धाक दाखवून या तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

पोलिसांनी तातडीने अपहरण झालेल्या तरुणीचा शोध सुरू केला. दरम्यान ही तरुणी एका तरुणासह स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने प्रियकरासोबत स्वतः पळून गेल्याचा जबाब दिला. घरचे लग्नाला मान्यता देत नसल्याने तिने प्रियकराला हाताशी धरून स्वतःच्या अपहरणाचा कट रचला होता.

संबंधित तरुणीने प्रियकरासोबत राहणार असल्याचे लिहून दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही सोडून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.